महाविकास आघाडी तर्फे विश्व आदिवासी दिनानिमित्त भोजनदान कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपुर : घुग्घुस येथे महाविकास आघाडी तर्फे विश्व आदिवासी दिनानिमित्त भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगातील आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्याची सुरुवात आमराई वार्ड येथून झाली. रॅलीच्या मार्गावरील बहादे प्लॉटजवळ महाविकास आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्यांनी भोजनदान व पिण्याच्या पाण्याचे वितरण केले.
भोजनदान कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला घुग्घुस पोलिस स्टेशनचे थानेदार राउत यांनी पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या उपक्रमात अनेक पत्रकार मित्र, समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.
या वेळी शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे वरिष्ठ नेते बालू चिकनकर, अमित बोरकर, हेमराज बावणे, चेतन बोबडे, शहर अध्यक्ष बंटी घोरपडे, गणेश उईके, राष्ट्रवादीचे शरद कुमार, काँग्रेस पक्षाचे राजकुमार वर्मा, विक्रम गोगला, समाजसेवक मारुती जुमनाके, पत्रकार बंधू प्रणयकुमार बंडी, साहिल सय्यद, अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव धीरज ढोके, आकाश गोरघाटे, सुमेध पाटील, धोबी समाज अध्यक्ष सचिन क्षीरसागर, योगेश पाझारे, अमोल बोबडे, खुशाल, प्रफुल, राहुल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.