ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे प्राथमिक विभागात विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व संस्मरणीय टप्पे असतात. याच काळात व्यक्तीमत्व घडते, ज्ञान मिळते आणि संस्कार होतात. शाळेतून शिक्षणासोबतच चांगले वागणे, शिस्त, सहकार्य, स्वावलंबन, नेतृत्वगुण यासारख्या मुल्यांचा विकास होतो. तर शाळेतील शैक्षणिक सत्राला गती देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसीत व्हावेत या उद्देशाने चांदा पब्लिक स्कूल येथे प्राथमिक विभागात विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी रेडिओलॉजिस्ट इन कॅन्सर हॉस्पीटल, चंद्रपूर चे डॉ. मिथून भोयर, इनरव्हील क्लब च्या प्रेसिडेंट सौ. अर्चना उचके, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

विद्यार्थी मंत्रीमंडळातील पद मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी बौध्दिक, मानसिक, शारिरीक अशा चाचण्यांमधुन जावे लागते. तेव्हाच विशिष्ट पदाकरिता त्यांची नियुक्ती करण्यात येते. प्राथमिक विभागातील विद्यार्थी मंत्रीमंडळातील नवनियुक्त सदस्यांमध्ये विद्यार्थीनी प्रमुख कु. दित्या पेटकर, उपविद्यार्थीनी प्रमुख कु. जिजाऊ माने, आचार्य चरक हाऊस प्रमुख कु. रूही जोगी, उपप्रमुख कु. इशान्वी मत्ते, महर्षी पाणिनी हाऊस प्रमुख चि. अध्ययन उमाटे, उपप्रमुख कु. ग्रीष्मा झाडे, आचार्य चाणक्य हाऊस प्रमुख कु. मिहीरा मस्से, उपप्रमुख कु. ओवी येरगुडे, महर्षी वेदव्यास हाऊस प्रमुख चि. अंश मल्लेलवार, उपप्रमुख कु. आर्या शेंडे यांची निवड करण्यात आली. विधीवत हाऊस टिचर यांनी वरील प्रमुख विद्यार्थ्यांना हाऊसचा झेंडा देत आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना मंत्रीमंडळाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. मिथून भोयर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य कसे विकसीत करायचे, जबाबदारीची जाणीव कशी ठेवायची, एकमेकांमध्ये सहकार्याची भावना कशी निर्माण करायची याविषयी मार्गदर्शन केले. तर सौ. अर्चना उचके यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पदाची जबाबदारी कशी पाळायची हे समजाविले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना जर तुम्हाला स्वतःमधील नेतृत्व कौशल्याचा विकास करायचा असेल तर जास्तीत जास्त वाचन करा, वृत्तपत्र वाचायची सवय लावा. असे सांगून तुम्ही आज विद्यार्थी मंत्रीपदावर निवडून आले आहात. ही तुमच्या कौशल्याची आणि गुणवत्तेची पावती आहे. पण हे पद केवळ मानाचा नाही तर जबाबदारीच आहे. शाळेतील शिस्त, स्वच्छता, एकता अभ्यास, विविध उपक्रम यामध्ये तुमचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व तुमचे पद केवळ निवडीपुरते नाही तर प्रेरणादायी कामगीरी साठी आहे. तुम्ही तुमच्या जबाबदा-या प्रामाणिक पणे पार पाडा. तुमचे सहकारी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या विश्वासास पात्र ठरा असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. संगीता बाग, कु. मृण्मयी मांदाडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. प्रितीमा खोब्रागडे यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रम प्रर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्याकरिता क्रिडा शिक्षक श्री. विनोद निखाडे, मनीषा नागोशे, प्रणोती चौधरी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये