ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता खराब असल्याने हेलिकॉप्टरची सुविधा द्या

पिपरी ( दे ) वासियांची निवेदनातून अनोखी मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

अवैद्य रेती वाहतुकीमुळे झाली रस्त्याची दयनीय अवस्था : ग्रामस्थ

        अवजड रेती वाहतुकीमुळे भद्रावती-पिपरी हा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालविणे सुद्धा मुश्किल झाले आहे. या खराब रस्त्यामुळे गावातील गावकरी तथा विद्यार्थी प्रभावित झाले असून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

या रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात नेहमीच होत असतात. रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाल्याने शासनाने गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अनोखी मागणी अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष अनुप खुटेमाटे यांचे नेतृत्वात पिपरी येथील गावकरी आणि विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश भांडारकर यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

अन्नदाता एकता मंचव्दारा पिपरी येथील गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी दिनांक ८ ला भद्रावती तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढून सदर समस्या शासनासमोर मांडली. पिपरी ते भद्रावती या रस्त्यावर अवैद्य रेतीव्यवसायिकांद्वारे अवजड वाहतूक करण्यात येत असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अगदी चाळण झाली असून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत निरुपयोगी झाल्याने गावकरी तथा विद्यार्थ्यांचे दळणवळण प्रभावित झाला आहे.

सदर मोर्चात अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष अनुप खुटेमाटे, रविंद्र खुटेमाटे, सुमित मडकाम संदीप खुटेमाटे, महेश आस्कर, रुचिता खुटेमाटे, सीमा खुटेमाटे यांच्यासह पिपरी येथील गावकरी तथा विद्यार्थी ऊपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये