आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने रणमोचन गावात नवीन डोंग्याचा पार पडला शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- मागील पंधरा दिवसा अगोदर ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी झाली. व त्यानंतर वैनगंगा नदीला तसेच भूती नाल्याला पूर आला. त्यामुळे भूती नाल्याच्या पाण्याच्या पात्रातून दररोज ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी उपलब्ध असलेल्या डोंगा पुरात वाहून गेला.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली. वेळीच रनमोचन येथील गावकऱ्यांनी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे डोंग्याची मागणी केली. त्यांनी वेळीच पन्नास हजार रुपये त्वरित आर्थिक मदत देऊन ही मागणी पूर्ण केली. परंतु तेवढ्या किमती पेक्षा डोंगा खरेदीला पैसे जास्त लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडून लोक वर्गणी जमा करून डोंगर खरेदी केला.
त्याचा शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ भुतीनाल्यावर संपन्न झाला. रणमोचन येथील शेतकऱ्यांना बोळेगाव येथील शेत शिवारात जाण्यासाठी भूती नाल्याच्या पाणी पात्रातून ओलांडून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. मात्र मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे पुरात डोंगा वाहून गेला. त्यामुळे नवीन डोंगा खरेदीसाठी गावातील शेतकऱ्यांनी लोक वर्गणी जमा केली. मात्र खर्च जास्त असल्यामुळे उर्वरित रक्कमे साठी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी केली. त्यांनी नवीन डोंगा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. त्यामुळे रणमोचन येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या आभार मानले. गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन डोंग्याच्या शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विलास मेश्राम, ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय प्रधान, ग्राम युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांदळे. शेतकरी विश्वनाथ तोंडरे, विनोद दोनाडकर, गंगाराम राऊत, पटवली भर्रे, सोमेश्वर दोनाडकर, जनार्दन सहारे, पटवारी तोंडरे, श्रावण तोंडरे, भाऊराव दोनाडकर, परमात्मा संगत साहेब, ईश्वर दोनाडकर, हरिदास भुरके,गजानन दोनाडकर, परमानंद पत्रे, व अन्य शेतकरी बांधव संख्येने उपस्थित होते.