घुग्घुसमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी काँग्रेसचं आत्मक्लेश आंदोलन
शासनाच्या निष्क्रीयते विरोधात संताप

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :- शहरातील गेल्या वर्षभरापासून पूर्णत्वास आलेली 30 खाटांची ग्रामीण रुग्णालयाची इमारत आजही बंद अवस्थेत असून ती केवळ शोभेची वस्तू बनली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले.
काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमांसमोर टाळ वाजवत त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र शासनाचा निषेध करत “महाराष्ट्र शासन मुर्दाबाद”च्या घोषणा देण्यात आल्या.
भाजपवर गरीब विरोधी धोरणांचा आरोप
यावेळी राजुरेड्डी यांनी भाजपा सरकारवर टीका करताना सांगितले की, गरीब जनतेला आरोग्य सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यांनी आयुष्मान भारत योजनेवरही सवाल उपस्थित करत देशातील 600 रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप केला. कोरोना काळानंतर आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देण्याची गरज असताना भाजप फक्त सत्ता टिकवण्यासाठी आमदार खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांचा संताप, आरोग्य सुविधांचा अभाव
यास्मिन सैय्यद, दिप्ती सोनटक्के, श्वेता आवळे या महिलांनी ग्रामीण रुग्णालय बंद असल्यामुळे महिलांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा स्पष्ट शब्दांत मांडल्या. गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी चंद्रपूरला जावे लागते, सिजेरियन ऑपरेशनसाठी जीव धोक्यात घालावा लागतो, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक्स-रेची सुविधा सुद्धा नाही, हे त्यांनी अधोरेखित केले.
मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित
या आंदोलनात काँग्रेसचे नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, निशा शेख, मंगला बुरांडे, शिल्पा गोहील, प्रीती तामगाडगे, पूनम कांबळे, ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, शेख शमिउद्दीन, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका, मोसीम शेख, देव भंडारी, अरविंद चहांदे, सैदू भाई, रोहित डाकूर, सुनील पाटील, भास्कर सोनेकर, दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप, निखिल पुनघंटी, कपिल गोगला, शहशाह शेख, दिपक कांबळे, बोधिराज कांबळे, गजानन उमाटे, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे, नामदेव खांदनकर, बंडू दुर्योधन, जोया शेख, भाविका आटे, पपीता वासेकर, आयेशा शेख, नंदा आत्राम, निलिमा वाघमारे, अलका जुनारकर, वर्षा पाटील, चंदा दुर्गे, चंदा जिवनकर, आणि अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
शहराच्या औद्योगिक महत्त्वाला साजेशा आरोग्य सुविधांची गरज
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही घुग्घुसमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचीच सुविधा आहे. त्यामुळे काँग्रेसने शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.