ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महसूल सप्ताह अंतर्गत पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड

चांदा ब्लास्ट
महसूल सप्ताह अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील सर्व मंडळातील पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नागाळा व वाढोली येथे उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) शुभम दांडेकर, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, ना. तहसीलदार सचिन खंडाळे, मंडळ अधिकारी, तलाठी कोतवाल, पोलिस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पतेतुन १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा एक भाग आहे, सर्व पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. त्या अनुषंगाने आज चंद्रपूर तालुक्यात मोहीम स्वरूपात पाणंद रस्त्यालगत झाडे लावण्याची कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.