ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

१८ व्या राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स विद्यार्थ्यांची दणदणीत कामगिरी

८ सुवर्ण व १ कास्य पदक पटकाविले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           आष्टेडू मर्दानी आखाडा फेडरेशन आॕफ इंडीया अंतर्गत महाराष्ट्र आष्टेडू मैदानी आखाडा असासिएशन व सातारा जिल्हा आष्टेडू मैदानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा २०२३ आष्टेडू आखाडा स्पर्धेचे दि. २८ व २९ आॕक्टोबरला श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा संकूल, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाना, महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू, हरियाणा या राज्यातील जवळपास १००० ते १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील सगळ्यात जास्त सुवर्ण पदक मिळवून देण्यात यश संपादन केलेले आहे.

तब्बल आठ सुवर्ण तर एक कास्य अशा एकूण ९ पदकांची कमाई करीत वरो-याच्या विद्यार्थ्यांनी केवळ वरो-याचेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात चमकविले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १६ वे वंशज, सातारा विधानसभा क्षेत्राचे आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.

                १२ , १४ , १७ व १९ या वयोगटात रितिक धवणे, वेदांत अटकाळे, पियुष विंधाने, यश नरडे, सोनू निकोडे, सानिया आवारी, पद्मश्री झुरडे, वेदीका भोयर यांनी सुवर्ण तर शोन दसुडे याने कास्य पदक पटकाविले आहे.

या सर्व खेळाडू चे शिवसेना जिल्हा प्रमुख( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी सत्कार व अभिनंदन करून फौंजी वारिअर्स मार्शल आर्ट ला स्पोर्ट वस्तूसाठी आर्थिक सहकार्य केला.

फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस वरोरा चे विद्यार्थी सातत्याने वरो-याचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही मोठं करित आहेत. हादभावना चौकातील इंदीरा गाःधी शाळेच्या आवारात हे सर्व विद्यार्थी गुरु राजू नकवे, प्रविण चिमूरकर, डी एन खापने, रवी चरुरकर, रविंद्र तुरानकर व अश्विनी नरड यांच्या मार्गदर्शनात कसून सराव करतात. या सर्व विद्यार्थ्यांवर वरोरावासियांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये