सचिन व्यास यांची शिवसेना सोशल मीडिया अमरावती विभागीय प्रमुख पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील उच्च शिक्षित युवक व सच्चा शिवसैनिक शहरात व पंचक्रोशीत शिवसेना पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील असलेले युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ यांचे खंदे समर्थक सचिन व्यास यांची पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत अमरावती विभागाच्या सोशल मीडिया प्रमूख पदी निवड केली आहे . शिवसेनेचे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांना नियुक्तीचे पत्र देताना
शिवसेना राष्ट्रीय सचिव तथा बुलडाणा जिल्हा पक्ष निरीक्षक माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवा, सिंदखेड राजा विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत बुलढाणा जिल्हा उपप्रमुख दिनकर खरात, देऊळगाव राजा तालुका प्रमूख सुदाम काकड देऊळगाव राजा शहर शिवसेना प्रमुख गोपाल व्यास व अन्य शिवसेने चे पदाधिकारी उपस्थित होते.