ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर नगर परिषदेवर काँग्रेसचा हल्लाबोल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सध्या गडचांदूर नगर परिषदेचा संपूर्ण कारभार प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या कडे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून येत्या काही दिवसांन मध्ये सणउत्सवाला सुरवात होणार असून शहरात विविध समस्या भेडसावत आहे त्या त्वरित सोडविण्या करिता काँग्रेस कमिटी गडचांदूर नगरपरिषदेवर हल्लाबोल केला. प्रमुख मागण्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर विद्युत रोषणाई करण्यात यावी, शहरात प्रत्येक प्रभागात पाईप टाकण्याचे काम काँक्रेट रस्ते खोदून करण्यात आले आहे.

त्यामुळे काँक्रीट रस्ते खराब झाले असून खड्डे पडले आहे ते त्वरित दुरुस्त करून खोदलेल्या रस्त्यांमध्ये काँक्रीट टाकण्यात यावे, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आजार पसरण्याचे लक्षात घेता नाल्यांमध्ये फॉगिंग मशीनने औषध फवारणी करण्यात यावी, शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, स्मशानभूमीची नियमित साफसफाई करण्यात यावी, सार्वजनिक शौचालयाची नियमित साफसफाई करण्यात यावी, शहरात बहुतांश नागरिक घरकुलापासून वंचित असून त्यांना लवकरात लवकर घरकुल वितरित करण्यात यावे, शहरात पॅक ड्रेन (नाल्यांवरील) चेंबर तुटलेले आहे विशेषतः नवीन ड्रेन झाल्या आहेत त्या नाल्यांवरील सुद्धा चेंबरचे झाकण तुटलेले आहे ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून तिथे वाचनालय उभारण्यात यावे, नालीचा गाळ काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी उचलण्यात यावा

अश्या विविध समस्यानां घेऊन नगरपरिषदेवर हल्लाबोल करण्यात आला यावेळी माजी उपाध्यक्ष नगर परिषद सचिन भोयर, शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, माजी गटनेते विक्रम येरणे, माजी नगरसेवक राहुल उमरे, माजी उपसभापती रउफ खान वजीर खान, कामगार नेते विजय ठाकरे, महादेव हेपट, सुनील झाडे, विवेक येरणे, अतुल गोरे, सुरज गोंडे, देविदास मुन, सुरेंद्र कामनकर, पुरुषोत्तम मेश्राम, अहमद भाई, शैलेश लोखंडे, प्रणित निवलकर, पंकज गावंडे, प्रेम कुमार मेश्राम, भीमराव चांदेकर, मनोज निकोडे,दादाजी मोहुर्ले महिला शहर अध्यक्षा किरण ताई एकरे, चंद्रभागा कोरवते, भारतीताई मडावी, वर्षा निवलकर, शालू ताजने, उषा खामनकर, मायाबाई खामानकर, सिंधुबाई खामानकर, वर्षा आत्राम, वर्षा राखुंडे, उपस्थित होते.नगरपरिषदेने सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये