जिवती पोलिसांची दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई
पोलिसांनी धाड टाकत हातभट्टी केली उध्वस्त !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील मालगुडा गावातील शेत शिवारात मोफुलाची हातभट्टी टाकून अवैधपणे दारू तयार करण्याचे काम सुरू होते, याबाबत जिवती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हातभट्टीवर धाड टाकत कारवाई केली,या कारवाईत गावठी दारूसाठी लागणारा मोह सडवा आणि गावठी दारू असा एकूण ११,५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तो गावाबाहेरील नाल्यात नष्ट करण्यात आला. या कारवाईत मालगुडा येथील चार इसमावर हातभट्टी मोह दारू व मोह सडवा विक्रीकरिता ठेवल्याने त्यांच्यावर दारूबंदी कायदे अंतर्गत कलम ६५ (इ) (फ) मदा का अन्वये चार इसमावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, उप पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी गडचांदूर रवींद्र जाधव यांच्या निदर्शनात जिवतीचे ठाणेदार सपोनी प्रवीण जाधव यांच्यासह वाघमारे, गवाले, पोलीस शिपाई जगदीश मुंडे, अतुल कानवटे,सुनील पवार, किरण वाठोरे,रजनी, स्वाती यांनी ही धडक कारवाई केली.