ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांकडुन अवैधरीत्या पेट्रोलची (ज्वलनशील पदार्थाची) चोरटी वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 06/05/2026 रोजी रात्रदरम्यान सावंगी मेघे येथील पोलीस पथक रात्रगस्त पेट्रोलींग डुटीवर असताना मुखबीर कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, मौजा दहेगाव गावंडे ते सालोड हिरापुर मार्ग वर्धेकडे एका मालवाहू पिकअप गाडीमध्ये अवैधरीत्या पेट्रोलची वाहतूक करीत आहे, अशा माहितीवरून पंचासह दहेगाव गावंडे ते सालोड हिरापुर कडे जाणा-या रोडवर नाकेबंदी करीत असताना काही वेळातच खबरेप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची मालवाहू पिकअप गाडी दहगाव गावंडे गावाकडून सालोड हिरापुर गावाकडे येताना दिसल्याने सदर गाडीस मोठ्या शिताफीने थांबवून पाहणी केली असता सदर मालवाहू गाडीचे मागील डाल्यामध्ये प्लास्टीक डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पेट्रोल ज्वलनशील पदार्थ आढळून आले, त्यावरून गाडीचा चालकास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव 1) विशाल दत्ताजी लखवादे वय 31 वर्ष, रा क्षीरसमुद्रपुर, ता. सेलू, जि. वर्धा असे सांगीतले. तसेच त्याचे सोबत गाडीमध्ये असलेले त्याचे साथीदार यांनी त्यांचे नाव 2) स्वप्नील आनंदराव सुरजुसे वय 31 वर्ष रा. येळाकेळी, ता. सेलू जि. वर्धा 3) सचिन शंकरराव वानखेडे वय 34 वर्ष रा. येळाकेळी ता. सेलू जि. वर्धा असे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवून गाडी चालकाचे ताब्यातून 1) 15 मोठ्या प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन 30 लि. प्रमाणे एकुण 450 लि. पेट्रोल प्रती लि. 104/रु. प्रमाणे किं. 46,800/रू. 2) एक हिरव्या रंगाची प्लास्टीक नळी अंदाज 40 फुट लांबीची किं 1000 रू. 3) एक महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क. एम.एच 27 एक्स. 8523 कि. 5,00,000/रू. असा एकुण जु.किं. 5,47,800/रु.चा माल अवैधरीत्या बिना पासपरवाना निष्काळजीपणे जवळ बाळगून आपले ताब्यातील बोलेरो मालवाहू गाडीमध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने तिन्ही आरोपीतांचे विरुध्द पो.स्टे. ला अप.क. 389/2026 कलम 3.7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम-1955 सहकलम 288 भा.न्या. संहिता 2023, सहकलम 130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात सपोनि श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पो.स्टे. सांवगी, पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर सा, प्रभारी ठाणेदार व पोलीस स्टाफ पो.उप.नि. सचिन कानडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, यांनी केली. पुढील तपास पो.उप.नि. सचिन कानडे, है करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये