ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर महामार्गाच्या कामाकरिता कंत्राटदार कंपनी जीआरआयएल हे अनेक उत्खननाच्या वादात चर्चेत असताना कंपनीची प्रशासनाचे वचक नसल्यामुळे बेफाम दिसेल त्या ठिकाणी दगड माती मुरूम उत्खननाचा सपाटा या भागात सुरू केला याबाबत जिल्हा प्रशासन खाली कर्म विभाग यांच्याकडे अनेक तक्रारी असून सुद्धा तालुकास्तरीय महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने यापूर्वी या भागात झालेल्या अवैध उत्खननाच्या बाबतीत दिनांक 8 मार्च 2024 ला रात्री एक वाजता देवघाट येथे पोकलेन मशीन व हायवा वाहनाने अवैद्य उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे तक्रारीवरून मौक्यावर उत्खनन स्थळाला पाहणी करूण वाहन तहसिलदार व्हटकर ठानेदार एकाडे यांनी ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयात जमा करूण सकाळी सोडून दिले दि २० जुन रोजी परवानगी नसताना उत्खनन वाहण वाहतूक गावकऱ्यांनी थांबवित पोलीसाना पाचारण केले.

रात्रौ ११ वाजता वाहन मौक्यावर कोरपना पोलीस पोहचले व वाहन क्र एम एच ४८, ४४६९ एम एच ४८, ६११४ बि आर ६४४७ एम एच ४८, ६१२ ८ हे वाहन ताब्यात घेऊन पोलीसात जमा केले व महसुल विभाग कार्यवाही करेल म्हणून पत्र देऊन कळविले मात्र तहसिलदार कोरपना यांनी रात्र उत्खनन करण्यासाठी कोणत्या विभागाने परवानगी दिली व कोणत्या आधारे वाहन सोडण्याचा आदेश दिला हे कळण्यापूर्वी दि २१ जुन ला ४ही हायवा वाहन कंपनीच्या स्वाधिन केले जि आर आय एल कंपनीने मुजोरी व नियम बाह्य या पूर्वी २०२३ मध्ये नाल्याची मंजुरी घेऊन पाटबंधारे विभागाच्या सांडतव्याचे उत्खनन करूण पाणी नियंत्रण गतीरोधक वॉल तोडफोड करूण नुकसान केल्याचा अहवाल व प्रत्यक्ष कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करूण झालेल्या नुकसानी संबंधाने जि आर आय कंपनी चे अवैध उत्खनन बंद करूण झालेल्या नुकसानी ला कंपनीला नोटीस देऊन जबाबदार पकडले मात्र कंपनीने वाल बांधकाम करण्यात येईल अशी हमी देऊन कार्यवाही टाळली मात्र उन्हाळभर गतीरोधक भिंती उभ्या न करता पावसाच्या हंगामात काम सुरु केले मात्र कालव्याचा विसर्ग झाल्यास नात्या काठावरील शेती चे व गावाना धोका निर्माण झाला आहे.

कंपनीला उत्खनन करण्यास बंद करून सुद्धा कंपनीने मे जून महिन्यात नियम बाहय उत्खनन करूण ठिक ठिकाणी खड्डे खोल केल्याचे दि २३ जून ला शाखा अभियंता यांच्या निदर्शनास आले वरिष्ठ अधिकारी यांना व्हीडीओ द्वारे सर्व चित्रीकरण दाखविले संभाव्य धोका व पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता शासकीय मालमत्तेला हानी व तांत्रीक दुष्टया अयोग्य पद्धतीने उत्खनन दिसून आल्याने कंपनी विरोध कार्यवाही करण्याची तक्रार पोलीस स्टेशन कोरपना यांचे कडे दिली मात्र पोलीसा कडून अजुन चौकशीचे चक्र फिरले नसल्याने नागरीकाचे लक्ष कार्यवाही कडे लागले आहे दि ५ जानेवारी २०२३ ते १८ एप्रील पर्यंत राजुरा / कोरपना तालुक्यातील २५ तलाव व नात्याचे दगड मुरूम मातीची परवानगी जिल्हाधिकारी यांचे कडून घेण्यात आले मात्र १ ते २३ अटीचे पालन कंपनीने केलेले नाही बोगस सिमांकन चुकीचे पंचनामे जलसंधारण विभागाचे उपयोगीता पत्र संशयास्पद आहे आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील जल जंगल जमीनीवर ग्रामसभेचा अधिकार असताना ग्रामसभेला डावलून परवानगी घेत अवैध उत्खनन करूण १ ते २३ अटी शर्ती भंग केल्याने शासनाच्या स्वामीत्व धनाला चूना लावल्या जात आहे या भागातील ग्रामीण अनेक रस्ते पावसापूर्वीच नासधूस व खड्डेमय झाले टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने निर्माण केलेले सिमेंट बंधारे नास घुस करूण वाहन जाण्याचे रस्ते तयार करण्यात आले नागरीकाच्या समस्या सोडविण्या कडे दुर्लक्ष होत असल्याने कुसळ येथिल गावकऱ्यांनी दि. २४ जून च्या रात्रो वाहन अडविले व खराब रस्त्यावर ४ गाडी रेती दगड खाली करूण वाहन बंद पाडले मात्र पुन्हा मुजोरीने दि. २५ ला सकाळी विना परवानगी कुसळ नात्यावर पोकलेन द्वारे उत्खनन सुरू असताना गावकऱ्यानी नात्यावरून खड्डयातून शेतीत जायचे कसे 3 ते ४ मीटर उतखनन तात्काळ थांबवित वाहन परत केले गावकऱ्यानी कंपनीचे प्रतिनिधि व प्रशासन अधिकारी मौक्यावर आल्याशिवाय खोदकाम होऊ देणार नाही अशी भुमीका घेतली यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सहसचिव आबिद अली मोहपत तोडासे दौलत तोडासे अकबर आत्राम वैभव किन्नाके बाबाराव सिडाम रामदास पोराते शतुधन पोराते सुनिल किन्नाके यांचे सह अनेक गावकरी उपस्थित होते या ठिकाणी असलेले वाहन अखेर गावकऱ्यानी परत पाठविले या भागातील रस्त्याची दैना व्यस्था झाल्याने नागरीकात रोष निर्माण झाला आहे कंपनी स्वताःच्या फायदयासाठी नियम बाह्य उत्खनन बंधाऱ्याची तोडफोड रस्त्याची दुरवस्था निर्माण करीत अवैद्य उत्खनन करून स्वामित्वधनाचे नुकसान केल्याचा आरोप नागरीकानी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये