ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओंकार ले – आउट मध्ये शिरले पाणी

मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           शहरातील ओंकार ले -आउट येथील खुल्या जागेवर नालीचे पाणी शिरत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांना गेल्या दीड महिन्यापूर्वी निवेदनाद्वारे वार्डवासीयानीं माहिती देऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र या समस्याकडे मुख्याधिकार्‍याने दुर्लक्ष केल्याने अखेर ले -आउट मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे .

कुंभार बोडी ते विजासन मार्गे जाणाऱ्या नालीतील पाणी घोडमारे लॉन येथून मधातच ओंकार लेआउट मध्ये शिरत होते ही समस्या पावसाळ्यात वाढणार याकरता माजी नगरसेवक शोभा पारखी यांच्या नेतृत्वात दीड महिन्यापूर्वी वार्ड वासियांनी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना या समस्येचे निवारण करण्याकरिता निवेदन दिले होते त्यांनी यावर कोणतीही उपाय योजना केली नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

 गेल्या तीन दिवस येणाऱ्या सतत धार पावसामुळे ले -आउट मधील घरासमोर पाणी शिरल्याने मोठे डबके तयार झाले आहे असेच पाणी वाढत राहिले ते सभोजालच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही या समस्याकडे मुख्याधिकारी जाणीवपूर्वक लक्ष देऊन या पाण्याची वाट मोकळी करून द्यावी अन्यथा येणाऱ्या समस्येकडे नगरपालिकेला तोंड द्यावे लागणार आहे.

[निवेदन देताना हे होते हजर ]

मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना ओंकार ले -आउट येतील माजी नगरसेवक शोभा पारखी,वैशाली सैताने, मंदाताई पारखी, शांताबाई बेलखुडे,सुवर्णा पारखी, ‘वाघमारे हे निवेदन देताना उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये