ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणीत वर्षावास कार्यक्रमाला सुरवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा पर्यंत दहावे पवित्र वर्षावास धम्मपर्व कार्यक्रम दिनांक १० जुलै ते ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे. या वर्षावास कार्यक्रमाकरिता वंदनीय भदंत प्रज्ञा किर्ती महाथेरो व भिक्यु विरिया पन्यो याच्या प्रमुख मार्ग दर्शनाखाली वर्षावास कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

१० जुलैपासून सुरुवात होणाऱ्या या वर्षावास कार्यक्रमात धम्म रॅली, भिक्खु संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन सुक्त पठण, धम्मदेसना तसेच दररोज सकाळी साडेपाच वाजता ध्यान साधना व बुद्ध वंदना तर सायंकाळी सहा वाजता बुद्ध वंदना व धम्म देसना कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वर्षावास कालावधीत भिक्खुला भोजनदान, चिवरदान, कठीण चिंवरदान, परिश्रम पाठ होणार आहेत. सहभागी होणाऱ्या उपासकांनी भंते किंवा समितीचे अध्यक्ष लिनता जुनघरे, सचिव छाया कांबळे , शिला खाडे, शालीनी गोरघाटे, विनय बोधी डोंगरे , जयदेव खाडे, सुरज गावंडे, प्रियवंद वाघमारे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन वर्षावास आयोजन समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये