ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू वाहतुकीवर छापा., १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्ध्यात धडाकेबाज कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे

 वर्धा शहरातील बेकायदेशीर दारू पुरवठा तसेच विक्री यावर आवर आणणेसाठी वरिष्ठांच्या सूचना मिळाल्याने पोलिस ठाणे वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चांगलीच कंबर कसली आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक पांढरी रंगाची कार क्रमांक MH36Z5999 ही समता नगर वर्धा परिसरात देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार आहे सदर माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करणेकरिता मार्गदर्शन केले .अशा माहितीवरून पोलीस स्टेशन परिसरात खाजगी वाहनाने अवैध धंद्यावर व वाहनावर कारवाई करणे करता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन वर्धा येथील पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई यांनी पो.स्टाफ सह समता नगर वर्धा परिसरात नाकेबंदी केली असता नमूद एक पांढरा रंगाची कार क्रमांक MH36Z5999 ही येताना दिसली. त्यातील चालक व त्याच्या बाजूला बसलेल्या अनोळखी इसमास पोलीस असल्याची जाणीव होताच ती कार मोक्यावरून पळून गेली.

सदर गाडीचा पाठलाग करून तिचा शोध घेतला असता ती मिळून आली असून सदर गुन्हातील आरोपी फरार आहे .नमूद कारची पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात 90 एमएल च्या टॅंगो पंच कंपनीच्या 51 खर्ड्याच्या खोक्याच्या पेट्या प्रति पेटी किंमत 10,000 रुपये प्रमाणे 5,10,000 रुपयाचा माल व एक पांढरा रंगाची महेंद्रा एक्स यु व्ही 500 कार क्रमांक MH36Z5999 कि.11,50,000 रुपये असा एकूण जुमला किंमत 16,60,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपी विरोधात पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हेतील आरोपी मोनू विश्वकर्मा व सौरव भगत हे असल्याची माहिती समोर येत असून हे दोघे वर्धा परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची बेकायदेशीर वाहतूक करत होते अशीही माहिती समोर येत आहे.पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई व त्यांचे टीम ने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, मा.अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रमोद मकेश्वर सर वर्धा विभाग यांच्या निर्देशनाप्रमाणे वर्धा ठाणे चे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात PSI विशाल सवाई, पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, पोलीस नाईक पवन लव्हाळे, पोलीस शिपाई श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे, अभिषेक मते सर्व पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये