ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाथरी येथील BSNL ची सेवा पाच दिवसापासून ठप्प

ऑनलाइन ची कामे विस्कळीत झाल्याने नागरिकात असंतोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल कंपनीने आपले जाळे सर्वत्र पसरविले आहेत तसेच उत्तम रेंज असल्याची सुद्धा गवगवा करीत असल्याने नेट चालवणाऱ्यांनी सुरळीत नेट चालावी म्हणून बीएसएनएल सिम घेऊन आपली ऑनलाइन कामे केली जात आहेत परंतु पाथरी येथील बीएसएनएल ची टावर पाच दिवसापासून बंद असल्याने याच्या नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

बीएसएनएल ही सरकारी दुरसंचार कंपनी आहे जी उत्तम सेवा देत होती परंतु आता तिच्या सेवांमध्ये अनेक समस्या येत असल्याने ग्राहकांना सिम बदलन्यायाची पाळी येत आहे पाच दिवसापासून बंद असलेले बीएसएनएलचे टावर मुळे अनेकांना नेटवर्कची समस्या येत आहे यामुळे इंटरनेट वापरणे, लोकांना काल करणे,शासकीय ऑनलाईन कामे इतर सेवा वापरण्यास अडचणी येत आहे.

याच्या त्रास नागरिकांना आपल्या ऑनलाइन कामे करताना दिसून येत असल्याने त्यामुळे येथील नागरिकांना याच्या चांगला फटका बसत आहे काही नागरिकांनी अधिकाऱ्याशी विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर अधिकारी देताना दिसून आले आहेत तरी बीएसएनएल ची सेवा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत करून द्यावी अशी मागणी नागरिकाकडुन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये