ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गोल्डन बॉय” ओम काकड यांचा डबल धमाका!

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्याने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा केली उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील मूळ रहिवासी आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सॉफ्ट टेनिसपटू ओम काकड याने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे. ओमने चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ओम काकड हा भारतासाठी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सॉफ्ट टेनिस खेळात प्रतिनिधित्व करत आला असून, त्याने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे त्याला “गोल्डन बॉय” म्हणून ओळखले जाते. आता त्याच्या या नव्या यशामुळे तो खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात आदर्श ठरला आहे.खेळ आणि शिक्षण यांचं एकत्रित यश म्हणजेच ओम काकड,” असं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.

या यशाबद्दल ओमने सांगितले, “खेळामुळे मिळालेली शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारीच मला सीए सारखी कठीण परीक्षा पास होण्यासाठी मदत झाली. दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन साधणे आव्हानात्मक असले तरी शक्य आहे, हे मी सिद्ध करू शकलो याचा मला आनंद आहे.”

ओमच्या या दुहेरी यशाबद्दल त्याचे शिक्षक,मित्र आणि कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला असून, सामाजिक माध्यमांवरूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये