ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथील वन सप्ताहाची सांगता

घोडाझरी तलाव परिसर येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

ब्रम्हपुरी वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाग भीड येथील प्रादेशिक वन विभागाने वन सप्ताह १ऑक्टोंबर ते ७ऑक्टोंबर पर्यंत साजरा करण्यात आला आहे नाग भीड वन विभागाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी प्रादेशिक वन विभाग येथील प्रवेश द्धार येथे फलक लावले आणि परिसर स्वच्छ करण्यात आला.

२ ऑक्टोंबर रोजी वन्य प्राणी आणि जंगल याविषयी माहिती देण्यात आली.३ ऑक्टोंबर रोजी प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावात वन्य सप्ताहाचे आयोजन करून वने आणि प्राणी हे कसे महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले.४ ऑक्टोंबर रोजी कोरंभी आदिवासी भागात शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी यांनी फेरी काढून वन्य प्राण्यां पासून संरक्षण करणे, झाडे लावा झाडे जगवा, रात्री जंगलात जावू नका, झाडे ही आपले सगे सोयरे वनचरे असे समजावे अशी माहिती देण्यात आली.५ ऑक्टोंबर रोजी कोसंबी (गवळी) येथे वनराई बंधारा बांधण्यात आला आणि वन परिक्षेत्र विभागात गस्त करण्यात आली.६ ऑक्टोंबर रोजी मंगरूळ येथील गावात सरपटणारे प्राणी याविषयी सर्प मित्र पवन नागरे व पक्षाच्या बाबतीत यश कायारकर यांनी माहिती देत जनजागृती केली आणि ७ ऑक्टोंबर रोजी सप्ताहाचा समारोप घोडा झरि तलाव पर्यटन स्थळी जंगल भ्रमंती , वनस्पती ओळख, नावे त्याचे उपयोग वन ओी ष धी, तृण भक्षी, मास भक्षि पक्षी सरपटणारे प्राणी जलचर न प्राणी यांची माहिती देत त्यांचे महत्त्व आणि वन्य प्राणी आणि मानव संघर्ष कसा टाळता येईल याकरिता वन विभागाच्या वतीने वन सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

नागभीड येथील प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी कन्नमवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक नेराल वार, तावा डे, आशिष अली सय्यद,वनरक्षक कुथे, सी डा म, कुळ मे थे, जिवतो डे, बुरडकर, सुरपा म, कु ढाकणे, बोरकर,खोब्रागडे, मैं द, झेप निसर्ग संस्था पक पवन नागरे व सहकारी, जनता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी सौ पा थोडे मॅडम, राऊत सर यांची उपस्थिती होती याकरिता वन मदत निस अनिल मांढरे, सचिन चीलं बुले, समीर चौ धरी, विजय ठाकरे, प्रभाकर मांढरे वन विभागाचा चालक जावेद यांनी विद्यार्थी व कर्मचारी यांची सुखरूप परत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडत वन सप्ताहाची सांगता करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये