राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व ओपन कंत्राटदारांची देयके अदा करा
राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हा कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राज्यातील सर्व विभागातील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची 89 हजार कोटी रुपयांची देयके गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित आहे.बिले प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदार तसा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम करणे अवघड जात आहे. सदर दयके मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न तथा निवेदने देण्यात आले.
मात्र अद्यापही ही प्रलंबित देयके देण्यात आली नाही. त्या याबाबत चर्चा करण्यासाठी शासनाकडे वेळ मागितला असता तो वेळही देण्यात आला नाही. त्यामुळे आर्थिक अडचण लक्षात घेऊन प्रलंबित असलेली देयके त्वरित चुकती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जगदीश लवाडिया यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले आहे.