साईप्रकाश कला अकादमीची ‘फाइन आर्ट ‘परीक्षेत बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भारतीय कला केंद्र लखनऊ,(उत्तर प्रदेश) तर्फे एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ‘फाइन आर्ट ‘ परीक्षेत भद्रावती येथील साई प्रकाश कला अकादमीचा निकाल १०० टक्के लागला आहे.प्रवेशिका ते तृतीय वर्षापर्यंत १३० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.पैकी ९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर बाकी विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
साईप्रकाश कलाअकादमी मधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विशेष योग्यता व प्रथम श्रेणीतून अधिका अधिक यश प्राप्त करण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी राखली आहे. प्रवेशिका प्रथम परीक्षेत यश पप्पुलवार, प्रवेशिका पूर्व परीक्षेमध्ये वृक्षा जंगले, प्रारंभिक प्रथम मध्ये कौशिक डांगे, प्रारंभिक पूर्ण मध्ये प्रज्वल लोखंडे, प्रथम वर्ष मध्ये तिथी मोघे , द्वितीय वर्षामध्ये हर्षदा वरारकर, तृतीय वर्षामध्ये सांजवी उज्वलकर व देवांशी चरडे या दोघींनी सारखे गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविण्याचा मान मिळविला. आज पर्यंत या माध्यमातून बरेच विद्यार्थी चित्रकला विशारद परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी सचिन बेरडे सर, विनोद ठमके सर क्षितिज शिवरकर सर ,नेहा प्रसाद आदि शिक्षक फार मेहनत घेत असतात विद्यार्थ्यांनी सर्व श्रेय शिक्षकांना दिले आहे. या घवघवीत यशाबद्दल पालकांनी विशेष आभार मानले आहे संपूर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. साईप्रकाश कला अकादमीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांचे कडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.पुढील वाटचालीकरीता खूप खूप शुभेच्छा
केंद्र संचालक विनय वासनिक,विनोद ठमके, क्षितिज शिवरकर, शालिक दानव सर,गणेश हनुमंते ,राणी हनुमंते, देवयानी रामटेके, कपिल ढोके,ललित कोलते, यांनीही विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.