ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोनम नृत्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रभावित

जूनासुरल्यातील धनगर बांधवांचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पूर्व विदर्भातील ग्रामीण भागात अनेक कलावंत आपली लोककला जोपासत आहेत. व या लोककलेचा वारसा हा चिरंतर असाच चालू रहावा या साठी सुधीर मुनगंटीवार यांनी झाडीपट्टी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन केले. या सांस्कृतिक कला महोत्सवात आपल्या गावातील लोककलेचे कौतुक व्हावे या साठी युवा सरपंच रंजीत समर्थ यांनी या सांस्कृतिक कला महोत्सवाची माहिती जूनासूर्ल्यातील धनगर बांधवांना दिली, व धनगर बांधवांनी या सांस्कृतिक कला महोत्सवात बोनम नृत्याचे सादरीकरण करून या सांस्कृतिक कला महोत्सवासाठी आलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना प्रभावित केलं.

           सांस्कृतिक मंत्रालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक क्रीडा संकुल, मुल येथे तीन दिवसीय झाडीपट्टी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कला महोत्सवाचे उद्घाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सिने. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. उद्घटनापूर्वी निघालेल्या मिरवणुकीत विविध कलावंतांनी आपल्या कला साकारल्या होत्या. यात बोनम या नृत्याने मिरवणुकीत रंगत आली. व या बोनम नृत्याचे सादरीकरण चालू असतानाच सिने अभिनेत्री या नृत्याने प्रभावित होऊन जूनासुरल्यातील धनगर बांधवांसोबत नृत्य करीत त्यांचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये