ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठवाड्यातून निघालेल्या जय बजरंग पायी दिंडीचे श्रींच्या नगरीत भव्य स्वागत

वरुड चे वारकरी सुधाकर करडेल करतात दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांची संपूर्ण सेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 मराठवाडा व विदर्भ च्या सीमेवर असलेल्या वरुड येथील गावकऱ्यांच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी जय बजरंग पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक 21/6/25 रोजी पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आलेल्या या दिंडीचे श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत देऊळगाव राजा येथे दिनांक 22 जून 2025 रोजी बायपास वरील श्रावणी लॉन्स येथे आगमन झाल्यानंतर विधिवत पालखीचे व वारकऱ्यांचे पूजन करून स्वागत करण्यात आले यावेळी मुख्य संयोजीका सौ मंगलाताई डोईफोडे शिक्षक सुधाकर डोईफोडे पत्रकार सन्मती जैन व 1982/83 च्या बॅचचे सर्व वर्गमित्र उपस्थित होते.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील रहिवासी सुधाकर करडेल व त्यांचा परिवार यात्रेकरूंना चारधाम यात्रा करण्यासाठी माफक दरात स्वतःच्या तीन ट्रॅव्हल उपलब्ध करून देतात गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांच्या परिवाराने विठू माऊलींच्या दर्शनासाठी जय बजरंग पायी दिंडी या नावाने वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान केले त्यांचा संपूर्ण परिवार हा धार्मिक असून दिंडीचा सर्व खर्च ते एकटेच करतात या दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना प्रवासात आर ओ चे पाणी देण्याची त्यांनी वाहनांमध्ये व्यवस्था केलेली असून मार्गस्थ असताना जर अचानक पाऊस आला तर त्याचे पासून बचाव करण्यासाठी दोन ट्रॅव्हल पन्नास सीटर सोबत ठेवण्यात आलेले आहेत सर्व वारकऱ्यांना पंढरपूर येथून परत आणण्यासाठी स्वतःच्या ट्रॅव्हल मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहे तर शेवटच्या तीन दिवशी वरुड व परिसरातून ज्याही वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली त्यांच्यासाठी मोफत ट्रॅव्हल प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेली आहे.

या पायी दिंडीचे प्रस्थान यावर्षी दिनांक 21/6/25 रोजी झाले असून सदर पालखी 328 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिनांक 4 जुलै 25 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला विठू माऊलींच्या चरणी नतमस्तक होणार आहे दररोज वीस ते 22 किलोमीटरचा प्रवास वारकरी करणार आहेत या पायी दिंडीत साठ महिला वारकरी व 25 पुरुष वारकरी मंडळी सहभागी झालेले आहेत या दिंडीमध्ये सहभागी सर्व वारकऱ्यांचे दिनांक 21/ 6/25 ते 4 जुलै 25 पर्यंत ठिकठिकाणी चहा नाश्ता जेवण व विश्रांतीची व्यवस्था ठीकठिकाणंच्या भक्तगणाकडून करण्यात आलेली असल्याची माहिती सुधाकर करडेल यांनी दिली या पायी दिंडीचे शहरात आगमन झाल्यानंतर बाय पास रोडवर आसलेल्या श्रावणी लॉन येथे सर्व वारकऱ्यांचे व पालखींचे स्वागत करण्यात आले यावेळी एकादशी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.

यासाठी मंगलाताई डोईफोडे सुधाकर डोईफोडे गजानन मुळे १९८२/८३ च्या बॅचचे वर्गमित्र सतीश कुलकर्णी, पत्रकार सन्मती जैन, अनिल बाहेती, निरज पारीख, गोपाल व्यास, रमेश दंदाले, प्रियदर्शन जिंतूरकर, संजय पाटील, जिल्हा परिषद च्या माजी सदस्य शारदा रमेश दंदाले, कविता बाहेती, सविता पाटील, ज्योती सुरळीकर, मनीषा कुलकर्णी, दिगंबर कायंदे, भगवान कायंदे, मन्मथ फुटाणकर, गजानन कुलकर्णी, यांनी अथक परिश्रम घेतले तर श्रावणी लॉन चे मालक गणेश रामाने यांनी मोफत लॉन्स उपलब्ध करून दिले तर चार भुजा केटरिंग वाले शिवा महाराज शर्मा यांनी सुद्धा कोणताही मोबदला न घेता अन्नदान करण्यासाठी संपूर्ण मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये