जनता शिक्षण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा

चांदा ब्लास्ट
जनता शिक्षण महाविद्यालयात दिनांक २१ जून २०२५ रोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे योगासन करण्यात आले.
आजचे जिवन इतके यकायकीचे व गतीमान बनले आहे की, आपण आपल्या शारिरीक व मानसिक आरोग्य, स्वास्थ कमकुवत बनत चालले आहे. जुन्या परंपरा लोप पावल्यामुळे शारीरिक कष्ट व अंग मेहनीतीची कामे कमी झालेली आहेत. त्यामुळे शारीरिक तक्रारी सुरू होऊन मानसिक स्ववस्थही नाहीसे झाले आहे.
अशावेळी आपल्या शरीराला निरोगी आणि बलशाही ठेवण्याकरीता योगाची गरज आहे म्हणून याचे औचित्य साधून आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जनता शिक्षण महाविद्यालयात योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी जनता शिक्षण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश पेटकर, डॉ. शिवराम सातपुते, राजेश पत्तीवार विजय मालेकर श्री. संजय रंगारी, श्री राजेंद्र जुमडे, श्री. मनिष पाटव, श्री. बालाजी जीवतोडे, श्री. राजु यामाटे तसेच विद्यार्थी व कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती