पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा तीनशे वृक्षसंवर्धनाचा संकल्प
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नालुक्यात तीनशे वृक्षसंवर्धनाचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक पं. स. कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करुन ह्या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कडुनिंब, पिंपळ, सप्तपर्णी, गुलमोहर, आंबा, पेरू, काजू आणि जांभूळ अश्या पंचवीस रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जलील शेख व सद्धमशेट्टीवार, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष राजू चौधरी, सरचिटणीस गणेश दुधलकर, शिक्षक पतसंस्थेच् अध्यक्ष जगदीश ठाकरे, संचालक गंगाधर बोढे, राजीव कुटेमाटे राहुल बिपटे, विलास कुळमेथे दिनकर गेडाम, दिनेश ऊईके प्रवीण बेलखुडे, प्रणित गोरख, बंड जुगनाके, श्रीरंग तुरारे, बाळ गुंडमवार, मधुकर वाटेकर, दिलीप आस्वले, सुभाष बोढाले, भाऊराव ठेंगणे, सुखदेव निरंजने व किसनदेव कोरडे आवि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यात पन्नास हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.



