ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली वनपरिक्षेत्रात जंगली हत्ती बंदोबस्त व व्यवस्थापनावर कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

     सावली वनपरिक्षेत्रात मागील वर्षभरापासून जंगली हत्तींचा धुमाकूळ होता. यात अनेक शेतकऱ्यांचे धान व मका पिकाचे नुकसान झाल्याने वनपरिक्षेत्र स्तरावर तात्काळ समिती गठीत करून मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची कारवाई करण्यात आली.

            हत्तींपासून मनुष्यहानी होऊ नये म्हणून वनविभागावर द्वारे बॅनर लावणे दवंडी देणे लाऊड स्पीकरवर सूचना देणे ग्रामपंचायती द्वारे सूचना देणे पोलीस विभाग तसेच गावातील सरपंच व पोलीस पाटील यांचे मदतीने वारंवार सूचना देऊन जनजागृती केली गेली तसेच हत्तीचे अस्तित्व असलेल्या काळात 24 तास वनविभागाचे पथक पाळतीवर ठेवून संरक्षणाची कामे केली गेली.

       मागील तीन वर्षापासून ओरिसा व छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या रानटी हत्तींचे अधून मधून सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश होत असतो. नुकत्याच चार दिवसापूर्वी सावली वनपरक्षत्रात दोन टचकर हत्तींचे आगमन झालेले होते. रानटी हत्तींपासून मनुष्यहानी होऊ नये म्हणून हत्तींपासून संरक्षण कसे करावे याचे कोणकोणती खबरदारी घ्यावी व काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत सावली वनपरिक्षेत्रातील मौजा राजोली येथे चार जून रोजी कार्यशाळा पार पडली.

         सदर कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिचाकुमार जीवशास्त्रज्ञ तथा हत्ती व्यवस्थापन तज्ञ रायपुर, डॉक्टर रविकांत खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश अहुजा जीव शास्त्रज्ञ ब्रह्मपुरी वन विभाग,नूर जीवशास्त्रज्ञ मध्य चांदा वन विभाग,नारनवरे जीवशास्त्रज्ञ चंद्रपूर वनविभाग यांनी मार्गदर्शन केले.

           विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही श्री विनोद दुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली,सुरेंद्र सिंग वाकडोद क्षेत्र सहाय्यक राजोली , नंदकिशोर पाटील शेत्र सहाय्यक पाथरी, रविश सूर्यवंशी क्षेत्र सहाय्यक व्याहाड, वनरक्षक श्रीराम आदे, अविनाश नाने,भुलेश्वर सोनेकर, महादेव मुंडे,एकनाथ खुडे श्रीमती प्रिया शेंडे,श्रीमती प्रिया वाघमारे तसेच शिरसी कडोली रयतवारी सोलापूर व विरखलचक येथील पीआरटी चमू, आरआरटी टीम, या एसटीपीएफ आणि मूल बफर व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.

         सदरच्या कार्यशाळेचे आयोजन प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व विकास तरशे सहायक वन संरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वन परिक्षेत्र अधिकारी सावली यांनी केले..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये