ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस शहरातील राजू पखाले यांचा मेडिकल कॉलेजला देहदान!

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :देहदान म्हणजे मृत्यू नंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी दान करणे हे दान वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचना आणि कार्यपद्धती समजून घेण्यास मदत करते.

या शरीरदाना मुळेच समाजाला उत्कृष्ट वैद्य (डॉक्टर ) मिळत असतात भारतीय समाजात धार्मिक विधिनुसार अंतिम संस्काराला प्रचंड महत्व असल्यामुळे देहदानासाठी सहजा – सहजी नागरिक तैयार होत नाही.

मात्र समाजात असे अनेक व्यक्ती असतात ते जिवंत असतांना देखील मानवीय समाजाच्या उपयोगी येतात व मेल्यानंतर ही मानवीय समाजासाठी उपयोगी पडतात घुग्घूस शहरातील अमराई वॉर्ड निवासी राजू संपतराव पखाले वय – 60 वर्ष यांना आपला शरीर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी यावे असे वाटत असल्यामुळे त्यांनी ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितले कुटुंबियांची परवानगी मिळताच पखाले यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांची भेट घेऊन आपल्याला देहदान करायचा असून आपण मला मदत करावी अशी विनंती केली असता काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे शरीर रचना शास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख मामीडवार यांची भेट घेऊन पखाले यांच्या देहादानाची प्रक्रिया पूर्ण करवून घेतली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, महेंद्र रेड्डी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये