ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन जाहीर सत्कार

शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ग्राम विकास शिक्षण संस्था पारडगांव (ब्रम्हपुरी)द्रारा संचालित ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे सहविचार सभा व मार्गदर्शन कार्यक्रमात वैचारिक क्रातीचा अग्रदूत दैनिक देशोन्नतीचे पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर यांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करण्यात आले.

जीवन गौरव पुरस्कार ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी तोंडरे साहेब यांनी पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांना शाल, श्रीफळ, स्मूतीचिन्ह व ग्रामगीता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध वस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सचिव आर.बी विधाते,उपाध्यक्ष डी.आर. रहेपाडे,कोषाध्यक्ष रमेश ठाकरे, संस्थेचे सदस्य निशांत पत्रे,प्रमिलाताई पत्रे, तसेच विष्णुजी तोंडरे मुख्यध्यापक बेटाळा, जे. के. ठाकरे मुख्यध्यापक हळदा, व दोन्ही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये