ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव शिंदे राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 बुलढाणा चे माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करण्यापूर्वी त्यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात येऊन राजमाता मा. जिजाऊ यांचे चरणी नतमस्तक होऊन कामाला सुरुवात केलेली आहे.

या मतदार संघात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढावी यासाठी त्यांनी नियोजन केले असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याचे रिझल्ट दिसून येतील असे यावेळी त्यांनी सांगून राज्यात महायुतीचे सरकार भक्कम पने विकास कामे करत आहे. केन्द्र सरकार व राज्य सरकार च्या ज्या ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी असे सांगितले.

यावेळी त्यांचे समवेत बुलढाणा जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, भाजपाचे ओ बी सी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील तोताराम कायंदे,भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ, विष्णू मेहेत्रे, दिलीप काळे,जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज हनुमंते, शहर अध्यक्ष संजय तिडके,माजी नगरसेवक राजेश भुतडा, निशिकांत भावसार, लोकेश डोणगावकर, भाजपाच्या महिला महामंत्री सविता संजय पाटील, देऊळगाव राजा तालुका माजी अध्यक्ष एकनाथ काकड, विकास डोईफोडे, संचित धन्नावत , डॉ. शंकर तलबे, यादवराव भालेराव, सत्यनारायण पावले उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये