ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना: कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे “तंबाखू मुक्त शाळा अभियान” अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची सामुहिक होळी केली.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना समजावून सांगितले. गावातील युवक ही तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे आपल्या कितीतरी पिढ्या नकळतपणे व्यसनाधीन झाल्या होत्या आणि आजही होत आहेत याचा आपण विचार करून तरुण पिढी तसेच बाल वयोगटातील मुले यांना त्यांच्या संस्कारक्षम वयात तंबाखू पासून दूर ठेवावे लागेल असे शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी पटवून दिले.

त्यामुळे ग्रामस्थांनी गावातील मुलांवर व्यसनमुक्तीचे संस्कार होण्यासाठी या तंबाखूमुक्त शाळा अभियानात सहभागी होऊन गावातील किराणा दुकान, पानठेले मधील तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थ एकत्रित करून शाळेच्या आवारात त्यांची होळी केली. तसेच माझे घर, माझे गाव आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त बनवेन, अशी शपथ घेऊन यापुढे गावामध्ये खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाणार नाही व आम्ही आजपासून तंबाखू मुक्त जीवनाचा संकल्प करत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.

या वेळी शाळेचे सर्व शिक्षक,विद्यार्थी आणि गावातील युवक मंडळ तथा गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये