Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था कोरपना येथे उदयोजकता प्रेरणा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 12 जानेवारी 2025 रोज रविवारला स्वातंत्र्य सेनानी गोविंद गुरु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासीं) कोरपणा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री भैयाजी येरमे साहेब (सहाय्यक आयुक्त) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र चंद्रपूर, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सचिन जी तिरंणकर (IMC सदस्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरपना) तसेच शुभांगी बेरड मॅडम (माजी प्रशिक्षणार्थी) पोलीस शिपाई, कोरपना तसेच श्री भालचंद्र रासेकर (प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरपना) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सर्व पाहुण्यांच्या व सर्व विद्यार्थांच्या उपस्थितीत पार पडला.

कोरपना येथील ग्रामीण भागातील तरुण व तरुणी यांनी कौशल्य आत्मसात करून उद्योजक कसे बनता येईल यावर श्री भैय्याजी.येरमे साहेब यांनी चांगले मार्गदर्शन करून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून कसे घडता येईल यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तेथील मुलांनी तंत्र प्रदर्शनी करणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले. आणि माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. श्री सचिन जी तिरणकर यानी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी कशे प्रयत्न केले पाहिजे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

श्री भालचंद्र रासेकर सर अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्याचा उपयोग कशे मोठे शिखर गाठता येईल, त्या मार्फत स्वतःची प्रगती कशी करता येईल. हे मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिले. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी घेऊन कार्यक्रम हा यशस्वी रित्या पार पाडला. या कार्यक्रमात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये