ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली पंचायत समितीने पटकाविला सद्भावना क्रिकेट चषक

पोलीस स्टेशन सावलीचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्याने पोलीस स्टेशन सावली च्या वतीने ‘चला एकत्र येऊया..’ या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारीला पार पडलेल्या अंतिम सामन्यात सावली पंचायत समितीने प्रथम येत चषक पटकवीला तर सावली पोलीस स्टेशनने द्वितीय स्थान पटकाविला.

      महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या संकल्पनेतून सदभावना क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे दुसरे वर्ष आहे.सद्भावना चषकाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांचे हस्ते पार पडले होते.तालुक्यातील पत्रकार संघ, पोलीस विभाग, तहसील विभाग, सरपंच संघ, पोलीस पाटील संघ, पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आपदा संघ, व्यापारी संघ, चालक मालक संघ अशा 16 संघानी सामन्यात सहभाग घेतला. अंतिम सामना पंचायत समिती सावली व पोलीस स्टेशन सावली यांच्यात चुरस झाली. यात प्रमोद जोनमवार यांच्या नेतृत्वातील पंचायत समितीने विरोधी संघातील सर्व खेडाळू बाद करीत चषक पटकावीला. पोलीस स्टेशनने दुसरा क्रमांक पटकावीला. मॅन ऑफ डी मॅच विजेते योगेश सहारे, मॅन ऑफ दी सिरीज विशाल दुर्योधन, बेस्ट बॉलर सुजित भसारकर यांनी सन्मान मिळविला. बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर काँग्रेस शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, उपनिरीक्षक राठोड,माजी सभापती विजय कोरेवार, नगरसेवक प्रफुल वाळके, सतीश बोम्मावार, प्रीतम गेडाम, अनिल गुरुनुले, चंद्रकांत गेडाम, प्रवीण गेडाम, उदय गडकरी, विजय गायकवाड उपस्थित होते. संचालन पत्रकार सूरज बोम्मावार यांनी केले. सर्वांना एकत्र आणण्याच्या उपक्रमाबद्दल पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये