आयुष्यमान भव: साप्ताहीक आरोग्य मेळावा व रक्तदान शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म याच्या हस्ते १३ सप्टेंबर ला आयुष्यमान भव योजनेचा शुभारंभ झाला.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात आयुष्यमान भव आरोग्य योजना राष्ट्रीय आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन आरोग्य यंत्रणा विभागामार्फत राबवण्यात येत आहे त्या अनुसंघाणे ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे आयुष्यमान भव:साप्ताहीक आरोग्य मेळावा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २३ ला करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डो.महादेव चिंचोले सर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालंय चंद्रपूर,उदघाटक नंदाताई बावणे नगराध्यक्ष न.प.कोरपणा,प्रमुख अतिथी प्रकाश व्हटकर साहेब तहसीलदार कोरपणा,संदीप एकाडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कोरपणा,प्रमुख उपस्थिती डॉ. बंडू रामटेके वैद्यकीय अधिकारिजिल्हा प्रशिक्षणकेंद्र चंद्रपूर,,डॉ हेमंत कन्नाके निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर,डॉ प्रकाश साठे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर,डॉ.स्वप्नील टेन्भे तालुका वैद्यकीय अधिकारी कोरपणा डॉ.संदीप बांबोळे वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.कोरपणा याच्या प्रमुख उपस्थितीत उदघाट्न झाले याप्रसंग अध्यक्षीय भाषण चिंचोले साहेब जिल्हा चिकित्सक यांनी आपले मनोगत देताना आरोग्या विषयी शासणाच्या राबवत असलेल्या योजनाची माहिती दिली.
त्या अनुषगांने जनतेने या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन गेले तसेंच आयुष्यमान भव साप्ताही क आरोग्य मेळाव्या निमित्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला २३ सप्टेंबरला पाच वर्ष पूर्ण झाले आयुष्य मान दिवस म्हणून आजचा दिवस ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे राबविण्यात आला.
या अंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ मोफत घेण्यात आलेल्या श्रीमती शशिकला सोनटक्के रा.सोनुर्ली यांना या योजनेतून ब्रेन ची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. त्याचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त केले. या योजनेचे चांगले काम केलेल्या वैभव बावणे आणी संजीव कांबळे यांना प्रशस्थी पत्र देण्यात आले तसेच आयुष्यमान भव आभा कार्ड वितरीत करण्यात आले .रक्तदान शिबिरात मुलाच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान केले पिता पुत्राचा प्राचार्य संजय ठावरी व अनुराग ठावरी तसेंच इतर रक्तदात्या चा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला
या आयुष्यमान भव आरोग्य व रक्तदान शिबिरास डॉ.आकाश जीवने,डॉ.अमित कांबळी,डॉ.मिथिले कुमार,डॉ भडारी मॅडम वैद्यकीय अधिकारी तसेंच आरोग्य कर्मचारी चव्हाण सहाय्यक अधीक्षक आकाश पाटमासे, केतन टाकले,नितीन राठोड,पूनम कचरे,निखिल गाडे,विनोद राठोड,मेघा कांबळे नितीन उरकुडे,विठ्ठल जाधव,विनोद झिंगरे,रजत गंगाहेडे,हिरालाल राठोड, आदिनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले शिबिराचे प्रारताविक डॉ कन्नाके सर संचालन संजय जीवतोडे समुपदेशक तर आभार डॉ.संदीप बांबोळे वैद्यकीय अधीक्षक यांनी मानले मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकाक उपस्थित होते.