Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

२९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

      वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी लोकमान्य विद्यालय चे प्रांगणात संपन्न होत आहे.

दिनांक २९ नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी ५.३० वाजता शेषानंद पांडे महाराज यांचे हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन व सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात होईल यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होईल याप्रसंगी प्रा.रूपलाल कावळे वरोरा यांचे मार्गदर्शन होणार असून रात्रौ ठीक ८.०० वाजता सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य रामपाल महाराज यांचा राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम होईल.

दिनांक ३० नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी ९.०० वाजता गोपालजी कडू गुरुकुंज आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा परिसंवाद स्पर्धा संपन्न होईल या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी म्हणून मनोज महाराज चौबे ,राज घुमनर उपस्थित राहतील. दुपारी ठीक १.०० वाजता महिला सम्मेलन बेबीताई काकडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून याप्रसंगी निर्मलाताई खडतकर,कविता येनुरकर, निता कोतमवार,साक्षी पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यानंतर सामुदायिक प्रार्थना प्रसंगी अरविंदजी राठोड चिंतन प्रगट करतील.

यानंतर सायंकाळी ७.०० वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमाला त्यानंतर कर्करोग प्रतिबंध लक्षणे व उपचार यावर डॉक्टर प्रफुल खुजे यांचे मार्गदर्शन होईल व रात्रौ ८.०० वाजता “स्वर गुरुकुंजाचे” हा राष्ट्रसंतांच्या भजनावर आधारित कार्यक्रम संयोजक अमोल बांबल व मानव सेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम मोझरी येथील विद्यार्थी सादर करतील. दिनांक १ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ७.०० वाजता रामधून निघेल याप्रसंगी रवींद्रजी ढवळे यांचे मार्गदर्शन होईल,दुपारी १२.०० वाजता शिवचरित्रकार व प्रबोधनकार ह.भ.प.किशोर महाराज ठाकरे आळंदीकर यांचा कीर्तन व गोपालकाला कार्यक्रम संपन्न होणार असून गोपालकाला प्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सर्वाधिकार लक्ष्मणरावजी गमे, खासदार प्रतिभाताई धानोरकर,हंसराजभैय्या अहिर माजी केंद्रिय राज्यमंत्री तसेच सेवकरामजी मिलमिले यांचे मार्गदर्शन होईल.

याप्रसंगी मंडळाची दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली तसेच सेवा गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमाला व त्यानंतर राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल , रात्रौ ८.०० वाजता संमोहन कार्यक्रम नवनाथ गायकवाड पुणे यांचा मनोविज्ञानावर आधारित मनोरंजनातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.संपूर्ण कार्यक्रम प्रसंगी श्री गुरुदेव जिजाऊ महिला भजन मंडळ चंद्रपूर साईनाथ भजन मंडळ भद्रावती व संत कृपा भजन मंडळ भद्रावती यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे वतीने करण्यात आलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये