ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्नेहामेळा मनात घर करून गेला

माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मिलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरपनाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा व गुरुवर्यांचा सन्मान समारंभ सोमवार दिनांक १२ मे ला वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथे पार पडला.

या स्नेह मिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डी जी खडसे, संजय ठावरी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक नारायण हजारे ,मारोती टेंभुर्डे, मारोती उईकें , प्रा. अरुण कुकडे , प्रा. ज्योती रेगुंडावार, प्रा. बांबोडे , प्रा. विलास भोयर , प्रा.पंदाम , प्रा. रमेश येलपुलवार , जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका शारदा हजारे , शिक्षक. रामकृष्ण मोहितकर,ओंकार घुघुल, घनश्याम पाचभाई , राजेंद्र कांबळे , लोखंडे,संगीता दरने , संध्या खंगार , पुष्पा सोयाम , संध्या चिवंडे, दादाराम घुबडे, संतोष देरकर , हेमंत लोडे , विलास धोटे, राजू लांडगे, ठवसे आदी उपस्थित होते. या सोहळ्याला १९९६ ला जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गापासून प्रवेशित २००२ इयत्ता सातवी पर्यंत शिकलेल्या आणि वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २००० मध्ये पाचव्या वर्गापासून प्रवेशित २००८ बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली व माजी विद्यार्थी श्रीकांत आसुटकर यांच्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने झाली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर गुरुजन व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता परसुटकर , संचालन संतोष हंसकर तर आभार उपेंद्र मालेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सबा अंजुम, नदीम सय्यद , स्नेहल आवारी, रुपेश बोरडे , विकी आमलेपवार , ओम पवार ,जयंत जेनेकर ,अमोल रणदिवे , विशाल मंचलवार , मोहब्बत खान,

रिता कारेकर , मनीषा निबुदे, राकेश पिंपळकर , विपीन डोके , ईश्वर तुरनकार , सुनील देरकर,प्रियंका कोटावार, दीपक एकरे , कुशाब मालेकर , दिग्विजय भोंगळे , अमित झुलकंटीवार, विकी मंचलवार,शितल मुनघाटे ,सोनम राऊत, लोकेश्वरी मोडक, यास्मिन शेख, आशिया शेख, तेजस्विनी हरबडे , शुभांगी बेरड, शशिकांत हंसकर, प्रिया ढवस, सुवर्णा मालेकर , मंगेश येसेकर , सतीश मुसळे,राहुल भुसारी, प्रशांत भोसकर,जयश्री निरांजने, स्वप्निल आखाडे, नैनेश आत्राम, स्मिता झूलकटीवार, योगिता दरणे, तृप्ती गोडे , संदीप माणूसमारे , अर्चना दरने , मिलिंद देवडे, नीता वासेकर , मंगला घुघुल, आशिष मोहुर्ले , प्रशांत बोरकुटे, आकाश नागपुरे, निलेश डाखरे , आशिष पेचे, तुळशीराम बल्की , अतुल पायघन, अमोल वाघमारे आदीनी सहकार्य केले.

शाळेच्या आवारात एकत्रित छायाचित्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या वास्तू पुढे माजी विद्यार्थी व शिक्षकांनी स्नेह मिलन आठवणीचा ठेवा म्हणून एकत्रित छायाचित्र काढली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये