ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अश्विनी अंभोरेचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कु. अश्विनी संतोष अंभोरे (माळीपूरा) हिने देऊळगावराजा हायस्कूल देऊळगाव राजा मधून बारावी कला शाखेततून 86 टक्के मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.त्याबद्दल तिचे आजोबा व आई-वडिलांसह तिचा मा. संतोषभाऊ खांडेभराड जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बुलढाणा यांचे हस्ते जाहीर सत्कार करून तिला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री एकनाथ सोनुने सेवानिवृत्त शिक्षक,श्री प्रकाश खांडेभराड सेवानिवृत्त मुख्याध्यापक,अरविंद खांडेभराड युवा कार्यकर्ते, जगनराव खांडेभराड,विजुभाऊ झोरे, ऋषिंदर फुलझाडे, नंदू अंभोरे, योगेश खांडेभराड, सुनिल अंभोरे इत्यादी उपस्थित होते