ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे वर्ग १२ वी (कला/विज्ञान/व्यवसाय) मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याकरीता गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा निकाल याही वर्षी ८८.३३ % लागला. कला विभागातून ६०० पैकी ४४० गुण घेत कु. अपर्णा खुशाल भोयर हिने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला, तर महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक कु. भारती उईके (४३१गुण), तृतीय क्रमांक कु. बालेश्वरी कोरवते (४३० गुण), चतुर्थ क्रमांक कु. चांदणी सोमलकर (४२३ गुण ), तर पाचवा क्रमांक सुजल झुंगरे (४१७ गुण) आणि विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक कु. पुष्पा गुलाब राठोड ( ४२१गुण ), द्वितीय क्रमांक कु. नितू निषाद (३९१ गुण), तृतीय क्रमांक कु. समीरा शेख (३५४ गुण ), तर चतुर्थ क्रमांक कु. श्वेता पिंपळशेंडे ( ३४८ गुण) अशाप्रकारे विज्ञान विभागाचा ९८.१७ % निकाल तसेच व्यवसाय विभागाचा १०० % निकाल लावत निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली.

       परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या बद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा

“गुण गौरव सोहळा” कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी हे यश मिळविले.

     सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.महेंद्रकुमार ताकसांडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालय कला/ विज्ञान प्रमुख प्रा. प्रशांत खैरे व्यवसाय विभाग प्रमुख प्रा. विजय मुप्पीडवार ,प्रा कु सोज्वल ताकसांडे तसेच पालक प्रतिनिधी गुलाब राठोड उपस्थित होते. अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक वृंद, आईवडील आणि स्वतःच्या परिश्रमाला देत कनिष्ठ महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रशांत खैरे यांनी सूत्रसंचालन डॉ. प्रा. राजेश बोळे यांनी केले तर आभार प्रा. कु. जयश्री ताजने मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा अशोक सातारकर, प्रा जहीर सय्यद, प्रा दिनकर झाडे, प्रा नितीन सुरपाम, प्रा अनिल मेहरकुरे, प्रा शिल्पा कोल्हे,प्रा प्रवीण डफाडे ,करण लोणारे, स्नेहल चांदेकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये