शेतकरी महिला निधी मधील पिडीतांना मिळणार दिलासा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
(आरोपीच्या 15,11,90,700.73/- रूपयाच्या मालमत्ता जप्ती अधिसुचना जारी.)
पोलीस स्टेशन सेलू, जिल्हा-वर्धा येथील अपराध क्रमाक 545/2024 कलम 406, 408, 409, 420, 467, 468, 471, 413,474,120 (व) भादंवी सहकलम 3, 4, 8 MPID ACT 1999, सहकलम 21. 22, 23, 25, 26 BUDS अॅक्ट मधील आरोपी ।) शरद अरुण कांबळे, वय 40 वर्षे (शेतकरी महिला निधी लिमीटेड संचालक) व इतर यांनी वर्धा आणि अमरावती जिल्हयामध्ये शेतकरी महिला निधी (एम. एन. बैंक) चे नावे 10 बोगस बैंक शाखा उघडुन त्यामध्ये गुंतवणुकधारकास कमी वेळात जास्त लांभाश देण्याचे आमीष देवून एकुन 27,383 गुंतवणूकदार यांचे कंडुन बचत ठेव, देनीक ठेव, मुदत ठेवीचे स्वरुपात एकुन 38,46,95,241/- रु. च्या ठेवी स्विकारुन ठरवून दिलेल्या मुदतीत ठेवी आणि लाभांश परतफेड न करता त्यांची फसवणुक केल्याने सदर गुन्हा दिनांक 25/6/2024 ला नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्याचे दिनांकापासुन 9 महिण्याचे कालावधीत आरोपीतांच्या 15,11,90,700.73/- रूपये रक्कमेच्या मालमत्ता पोलीसांनी शोधुन त्या मालमत्ता शासन जप्त करुन, त्यावर सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वर्धा, यांची नेमणुक करण्यात आल्यावावत शासन राजपत्र अधिसुचना दिनांक 8/4/2025 रोजी शासनाकंडुन प्रसिध्द करण्यात आली. त्यामुळे गुन्हयातील पिडीतांना नजीकच्या काळात अपहारीत रक्कम परतफेड करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांचे मार्फत सुरु होनार असल्याने पिडीतांना दिलासा मिळणार आहे.
सदरची बाब शासन स्थरावर मार्गी लावण्याकरीता मा. पालकमंत्री आणि मा. आवी मतदार संघाचे लोकप्रतिनीधी यांच्या कडे पिडीतांनी पाठपुरावा केल्याने त्यांचे सहकार्य लाभले. सदर उत्तम कामगिरी आर्थिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपअधिक्षक पुंडलीक भटकर, पोउपनी शांताराम मुदमाळी, विवेक राउत, सहायक फौजदार गजानन काळे, संतोष जायस्वाल, पोहवा शैलेश भारशंकर, निकेश, स्वप्नील, कुनाल, मनोज, प्रतीक यांनी मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन आणि अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली करुन अधिसुचना प्रसिध्द राजपत्राची प्रत मा. अपर पोलीस महासंचालक श्रिमती अश्वितीजी दोरजे मॅडम यांचे हस्ते पिडीत देवानंद बाराहाते व इतर पिडीतांना देण्यात आली.