मा. अपर पोलीस महासंचालक यांचे वर्धा जिल्हा पोलीस विभागाचे वार्षीक निरीक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग व नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती अश्वती दोरजे यांचे सन २०२४-२०२५ वर्धा पटकाचे वार्षीक निरीक्षण व भेट दौरा दि. २४.०४.२०२५ ते दि. २६.०४.२०२५ दरम्यान संपन्न झाला आहे.
त्यादरम्यान मा. महोदया यांनी वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय येथील शाखा यांना भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. त्यादरम्यान वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पांची बैठक घेवुन समस्या जाणून घेवुन मार्गदर्शन केले.
वर्धा जिल्ह्यातील संपुर्ण पोलीस दलाचा गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकी दरम्यान वर्धा जिल्ह्याचे अभिलेखावर दाखल गुन्ह्यापैकी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथील ४ गुन्ह्यातील, पोलीस स्टेशन आर्वी येथील २ गुन्ह्यातील, पोलीस स्टेशन तळेगाव (शा.पं.) येथील एका गुन्ह्यातील अशा विविध गुन्हातील एकुण 384 प्रेम सोन्याचे दागीने व दोन दुचाकी वाहन असा एकुण अंदाजे कि. ३५,०१,००० रु. चा मद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकटीकरण पथक यांचे मार्फतीने वरील गुन्हे उघडकीस करुन आरोपीतांकडुन जप्न करण्यात आला होता. सदर मुद्देमाल सुपुर्तनाम्यावर फिर्यादी यांना परत करण्याचा मा. न्यायालयीन आदेश प्राप्त करुन घेवुन मा. अपर पोलीस महासंचालक महोव्य यांचे हस्ते संबंधीत फिर्यादी यांना परत करण्यात आला, तसेच संपुर्ण वर्धा जिल्ह्यातील ज्या नागरीकांचे मोबाईल चोरी किंवा गहाळ झाले होते असे एकुण १२ मोबाईल सायबा सेल, वर्धा कडुन ट्रेस करुन घेवुन मा, अपर पोलीस महासंचालक महोदय यांचे हस्ते मुळ मालकांना सुपुर्त करण्यात आले.
तसेच आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा येथील एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये आरोपीच्या १५,११,९०,७०० रु. किमतीच्या मालमत्ता पोलीसांनी शोधुन शासन जाम करुन पिडीतांना अपहारीत रक्कम परत केली, सदरचे मालमत्ता जप्ती शासन राजपत्र पिडीतांना मा. अपर पोलीस महासंचालक यांचे हस्ते देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्याकरीता वर्धा जिल्ह्यातील सर्व जातीय धर्मीयांचे सामाजीक कार्यकत्र्यांना बोलावुन शांतता कमीटी बैठक घेवुन चर्चा करण्यात आली.
सदर वर्धा जिल्ह्याचे दौरा व वार्षीक निरीक्षण दरम्यान पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे वार्षीक निरीक्षण पोड पार पडली असुन सदर परेडचे संचालन पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर रतनकुमार कवडे यांनी केले.