अखिल कुणबी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी स्वप्निल मोहितकर तर शहराध्यक्षपदी संदीप गोखरे
महिला तालुका संघटक पदी लिला ढुमणे तर शहर अध्यक्षपदी मोनालिका कोल्हे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 3 रोज शनिवारला पार पडलेल्या अखिल कुणबी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी स्वप्निल मोहितकर, शहर अध्यक्षपदी संदीप गोखरे तर शहरातील लीला ढुमणे यांची महासंघाच्या तालुका महिला संघटक पदी तर महिला शहर अध्यक्ष पदी मोनालीका अतुल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महासंघाच्या कार्याला तालुक्यात व शहरात गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
सदर सभेला अखिल कुणबी महासंघाचे राज्याध्यक्ष डी. के. आरिकर तथा विदर्भ व जिल्हास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय महासंघाच्या तालुका संघटक पदी योगेश ताजने, तालुका सचिव पदी अमित दौलतकर, तालुका सह सचिव प्रकाश पिंपळकर व शहर संघटक पदी उमेश काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे प्रमिला ताई लेडांगे राज्य उपाध्यक्ष, विद्याताई चिताडे महिला जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, नूतन लेडांगे संपर्कप्रमुख चंद्रपूर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अतुल कोल्हे, करुणा मोघे, वनिता घुमे, गजानन घुमे तथा सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या नवनियुक्त महासंघाच्या सर्व कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.