जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंडकीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा
सैनिकी स्कूल परीक्षेत तीन विद्यार्थी झाले क्वालिफाय शाळेचा अभिमान उंचावला
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत मेंडकी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी सैनिकी स्कूलच्या परीक्षेत क्वालिफाय झालेले असून शाळेचा व गावाचा नाव उज्वल केला आहे.या विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास,मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे यश संपादन केलेले आहे.
या यशामागे पालकांचे प्रोत्साहन,शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थांची मेहनत आहे.देवर्ष फाल्गुन आंबोरकर, सान्वी सुनील दुधे, देव्या गुरुदेव वाघुळकर असे हे तीन विद्यार्थी.शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय हरिदास तलमले सर यांनी सांगितले,”ही केवळ शाळेचीच नव्हे तर संपूर्ण परिसराची अभिमानास्पद बाब आहे.यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल”.
शाळेतील कु. नलिना शहारे मॅडम यांनी या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले.सुट्टीच्या दिवशी शाळेत जाऊन ज्यादा वर्ग घेतले.यांचे या यशात मोलाचे योगदान आहे.शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले,अभिनंदन केले.
हा निकाल शाळेसाठी ऐतिहासिक असून यापुढील काळात विद्यार्थ्यांना आणखी अशा संधी मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.