16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याकरीता चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होत असतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठया संख्येने वाहन येणे, वाहतुकीची कोंडी होणे, वाहतुक व रहदारी सुरळीत सुरू राहावी तसेच कोणतेही अनुचित घटना / दुर्घटना घडू नये म्हणून 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30(2) (XI). (XVII), (XX) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयांनी अनावश्यक गर्दी कमी ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. नागरीकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपात्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दूरध्वनी क्र. 07172- 250077 या यावर संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशात नमुद आहे.