खासदारांच्या जनता दरबारात कोर्टीतुकूम येथील विविध समस्यांचे निरासरण
खासदार धानोरकरांनी जाणून घेतल्या ग्रामवासीयांच्या मागण्या

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीतुकूम गावातील विविध समस्या खासदारांच्या जनता दरबारात सादर केल्या यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मौजा कोर्टीतुकूम येथील जिल्हा परिषद शाळा आहे परंतु अजून पर्यंत शाळेची रंगरंगोटी झाली नसून ती आपल्या निधीच्या मध्यमातून करून द्यावी तसेच शाळेच्या आवारात गट्टू लावून सहकार्य करावे. गावात येण्यासाठी रस्ता एकच आहे परंतु तो खराब झाला असल्याने त्याला आपल्या खासदार निधीतून निधी देऊन तो रस्ता नव्याने पूर्ण करावा. गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाली आहे पण पाच वर्षांपासून नाली सफाई झालेली नाही आपणास विनंती आहे कि आमच्या गावातील रस्ते आणि नालीचे बांधकाम करून सहकार्य करावे. गावात स्टील लाईटची परिपूर्ण व्यवस्था नाही ती आपल्या माध्यमातून पूर्ण करावी. गावाची लोकसंख्या २०० च्या घरात आहे. पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे गावात पाण्याची समस्या त्वरित सोडविण्यासाठी हापशी (हात बोरिंग) ची व्यवस्था आपल्या माध्यमातून पूर्ण करावी. असा विविध मागण्या यावेळी जनता दरबारात सादर केल्या.
यावेळी बल्लारपूर तालुका काँगेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोविंदापाटील उपरे, महिला काँगेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष अफसाना सय्यद मॅडम, कोर्टीतुकूमचे राजू मेश्राम, महिला काँग्रेस कमेटी तालुका उपाध्यक्ष नाजूका हनुमान आलाम तसेच अनेकांची उपस्थिती होती.