ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळाआयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये नगरपालिका देऊळगाव राजा अग्निशमन दलाचे ऑपरेटर भगवान मापारी यांनी विद्यार्थ्यांना आगीचे प्रकार, त्यांचे व्यवस्थापन यामध्ये आग लागण्याचे विविध कारणे, ज्वलनशील पदार्थांचे गुणधर्म आणि त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करत घरगुती गॅसचा सुरक्षित वापर, गॅस लीक झाल्यास घ्यायची काळजी, तसेच औद्योगिक आगींच्या वेळी करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजना यावर माहिती दिली. त्यानंतर, नगरपरिषद दे राजा अग्निशामक दलाची ऑपरेटर भाऊसाहेब साबळे यांनी अग्निशमन दलाच्या ताफ्याने प्रत्यक्ष अग्निशमनाचे प्रात्यक्षिक सादर केले.

ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, अरुण मोकळ, मुख्याधिकारी न. प. देऊळगाव राजा, गणेश मुळे, अग्निशमन अधीक्षक, देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच या कार्यशाळेला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव, संजय लाड व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये