महसूल सप्ताह शुभारंभ व वृक्षारोपन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 01.08.2023 ते 07.08.2023 पर्यंत महसूल प्रशासनातर्फे महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज दिनांक 01.08.2023 रोजी महसुल दिनाचा शुभारंभ करण्यात आला. महसूल दिनाचे अवचित्य साधुन तहसिल कार्यालय, वर्धा अंतर्गत वर्धा तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी साझा तसेच तहसिल कार्यालय, वर्धा चे प्रांगणात एकुण 382 वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच एकुण 317 7/12 वाटप व एकुण 321 शैक्षणिक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमाकरीता मा. उपविभागीय अधिकारी श्री. दिपक कारंडे, मा. तहसिलदार श्री. रमेश कोळपे यांचे मार्गदर्शनात तहसिल कार्यालयातील अधिकारी श्री. अजय धर्माधिकारी, नायब तहसिलदार, श्रीमती बाळुताई भागवत, नायब तहसिलदार, श्रीमती हेमा जाधवर, नायब तहसिलदार, श्री. भगवान वनकर, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयातील कर्मचारी वृंदांनी वृक्ष लागवडीकरीता तसेच इतर उपक्रम राबविण्याकरीता योगदान दिले. दिनांक 01.08.2023 पासुन दिनांक 07.08.2023 पर्यंत महसुल सप्ताह साजरा करण्यात येणार असून सदर कालावधीत तहसिल कार्यालय, वर्धा तर्फे खालील प्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
1. युवा संवाद
2. एक हात मदतीचा
3. जनसंवाद
4. सैनिक हो तुमच्यासाठी
5. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सत्कार व संवाद