Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ कृषि महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषि महाविद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष , लोकशाही गनराज्य घडविण्याचा तसेच विचार , अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा आणि उपासना याचे स्वतंत्र तसेच दर्जाची व समान संधीची समानता निश्चितपने प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला.

भारतीय संविधानाच्या प्रस्थाविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव, प्रा. मोहजीतसिंग राजपूत, प्रा. नारायण बोडखे, प्रा संदीप टेकाळे, अर्चना जत्ती व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये