ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ‘बेंड द बार’ च्या मुलांना सुवर्णपदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       कष्ट, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर भद्रावतीच्या खेळाडूंनी महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून आपले नाव उज्ज्वल केले आहे. नागपूर येथे दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत भद्रावती येथील ‘बेंड द बार फिटनेस’ जीममधील खेळाडूंनी विशेष कामगिरी केली.

५९ किलो वजनगटातील सब ज्युनियर गटात भुषण ताजने याने ३०७ किलो वजन उचलून तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याचप्रमाणे ज्युनियर गटातील ५९ किलो वजनगटात यश वाघमारे याने आपली ताकद दाखवत द्वितीय क्रमांक मिळविला. एवढेच नव्हे तर डेडलिफ्ट या प्रकारात त्याने प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेत विशेष छाप पाडली. यासोबतच मास्टर ओपन गटातील ६६ किलो वजनगटात अमोल आवळे यांनी जबरदस्त कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा पट्टा मिळवत भद्रावतीचे नाव संपूर्ण राज्यात गौरवले.

या सर्व यशामागे जीमचे संचालक अनुप वाघमारे व अरविंद वाघमारे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्तरावरूनही या खेळाडूंना भरभरून शुभेच्छा मिळत असून त्यांच्या यशामुळे भद्रावती शहराला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

पॉवरलिफ्टींगसारख्या शारीरिक ताकदीच्या खेळात ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी चमक दाखविल्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे. ‘बेंड द बार’ जीममधून घडलेले हे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नक्कीच यशाची शिखरे सर करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये