अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अतुल कोल्हे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी भद्रावती येथील पत्रकार अतुल सुरेश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल कुणबी महासंघाचे काम (कार्य) संघटन संपूर्ण देशात मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल कुणबी महासंघाची स्थापना करण्यात आली. अखिल कुणबी महासंघामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन हे नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीपत्र अखिल कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दलित मित्र तथा आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांच्या हस्ते चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या एका सभेत प्रदान करण्यात आले. या वेळी अखिल कुणबी महासंघाचे आशिष येडांगे, अतुल ठाकरे, सुधीर कोरडे, अमोल काकडे, रेखा जाधव, वर्षा कालभूत, विद्या चिताळे, देवेंद्र वट्टे, नूतन लेडांगे, महेंद्र शेरकी तथा विठ्ठलराव बदखल हे उपस्थित होते.
कोल्हे यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कुणबी चळवळीला गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.