बाबासाहेबांची जयंती म्हणजेच प्रेरणा, परिवर्तन, आणि आत्मपरीक्षणाचा दिवस : दिप्ती सोनटक्के

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपुर) : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कार्यालयात उत्साहात आणि अभिमानाने जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महिला नेत्या दिप्ती सोनटक्के, काँग्रेस महासचिव अलीम शेख व सुनील पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी “बाबासाहेब अमर रहें” च्या जोरदार घोषणा देत पेढे वाटून जयंतीचा आनंद साजरा केला.
या वेळी बोलताना नेत्या दिप्ती सोनटक्के म्हणाल्या, “बाबासाहेबांची जयंती ही केवळ उत्सव नव्हे, तर समाज परिवर्तनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. त्यांच्या विचारांनी आजही अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते.”
कार्यक्रमास काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, नुरूल सिद्दीकी, अभिषेक सपडी, अरविंद चहांदे, कपिल गोगला, शहंशाह शेख, आयुष आवळे, मनोज चांदेकर, साहिल आवळे, अंकुश सपाटे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सामाजिक, समता आणि बंधुतेचा संदेश देत करण्यात आली.