मोजा पारडी येथे क्रांती सूर्य माहात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
11 एप्रिल रोजी मौजा पारडी येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने सकाळी घरोघरी रांगोळ्या, परिसर स्वच्छता करण्यात आले.संध्याकाळी दिप दिंडी गावातुन काढण्यात आले.या मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतीकात्मक रूप तयार करून रथावर आरूढ होऊन दिंडी गावातुन काढण्यात आली.
याप्रसंगी पारडी गावचे शेंडे दाम्पत्य यांनी 10×15 ची जमीन पुतळा तयार करण्याकरिता दान स्वरूपात उपलब्ध करून दिली.त्या ठिकाणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो चे अनावरण श्री अनंता पाटील गोडे, श्री शंकर तलांडे केंद्रप्रमुख, श्री सुंदरलाल गेडाम सर श्री यादव गुरनुले, श्री निलेश वरखडे सरपंच, श्री रामदास कुमरे मा.सरपंच श्री बोडखे पो.पा.यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी गावातील सर्व महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती.
जयंती निमित्ताने पाहुणे मंडळी मार्गदर्शन केले.व नंतर सर्व उपस्थितांना आणि सर्व गावातील मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.या बहुमुल्य कार्याकरिता श्री यादव गुरनुले सर आणि नवयुवक मिळुन समिती गठीत करण्यात आले.या करिता समिती ने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.