सामाजिक न्याय पंधरवाडा उपक्रमाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सतत 15 दिवस गावोगावी सभा घेऊन या महामानवांच्या विचारांची पेरणी समाजामध्ये करून सुजाण,स्वाभिमानी, वैचारिक प्रगल्भ समाज निर्माण करण्याचे ध्येय सामाजिक न्याय पंधरवाडा च्या माध्यमातून साधणार आहे.
– डॉ. अंकुश गोतावळे
राज्यसमन्वयक- सकल मातंग समाज
जिवती :- तालुक्यातील चिखली खुर्द येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या निमित्ताने सामाजिक न्याय पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय पंधर वाडा निमित्ताने गावोगावी जाऊन महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी समाजामध्ये करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा मानस आयोजकांचा आहे.
सोबतच २० मे २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश आंदोलनाची प्रसिद्धी करून जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अंकुश गोतावळे तर मार्गदर्शक म्हणून प्रा. बालाजी मोरे, दत्ता तोगरे,बालाजी वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक गोतावळे, अंबादास गोतावळे, रामचंद्र केदासे, पोलीस पाटील उपसरंच सुनीता केदासे,ग्रा. प सदस्य गोविंद दुबले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास कांबळे यांनी आभारप्रदर्शन नितेश ढगे यांनी तर सूत्रसंचालन डॉ चरण केदासे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास कंचकटले, दीपक ढगे, चंद्रभान केदासे, धोंडिबा गोपले, मारोती गोपले, श्रीधन कंचकटले, तुळशीदास केदासे, शिवाजी पाटील,रानबा दुबले, अंकुश सूर्यवंशी यांनी परिश्रम केले.